Skip to main content

गोंड


गोंड

गोंड ही भारतातील प्रमुख आदिवासी जमात आहे. ही आदिवासी जमात महाराष्‍ट्रातील चंद्रपूर,अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यात प्रामुख्याने वास करते.

आर्य येण्याआधी गोंड जमातीचे अस्तित्व होते. रामायण, महाभारत काळात गोंड हे वैभवी अस्तित्वाचे धनी होते. गोंडांची अतिप्राचीन व समृद्ध भाषा होती. आजही ती आहे. ‘गोंड की कोईतूर’ असा एक सूर गोंड समूहात अलीकडे जोर धरू लागला आहे. परंतु ‘कोईतूर’ हाच मूळ व अचूक शब्द होय. ‘कोईतूर’चा अर्थ होतो माणूस. प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेदा’तदेखील ‘गोंड’ असा शब्दप्रयोग नसून ‘कुयवा’ म्हणजे ‘कोया’ असा शब्द आढळतो. ‘गोंड हे नाव त्यांना इतरांनी दिले आहे’, असे कै. डॉ. इरावती कर्वे यांनी त्यांच्या ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात म्हटले आहे.

गोंडी लिपीसंपादन करा

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये गोंडी भाषा बोलणार्‍यांची संख्या मोठी आहे. आता ही केवळ ‘बोली’ राहिली नसून ‘भाषा’ झाली आहे, कारण तिची लिपी उपलब्ध आहे. व्यंकटेश आत्राम, मोतीरावण कंगाली, विठ्ठलसिंग धुर्वे आणि इतरही अभ्यासकांनी गोंडी लिपी आपापल्या ग्रंथांमध्ये प्रसिद्ध केली आहे. गोंडी भाषेचा शब्दकोश व तिचे व्याकरण यांवरही विपुल साहित्य उपलब्ध आहे. काही सन्मान्य अपवाद वगळता या भाषेच्या भाषाशास्त्राकडे किंवा सौंदर्यशास्त्राकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. लिंग, वचन, काळ, विभक्ती यातही गोंडी स्वयंपूर्ण आहे.

अतिप्राचीन गोंडवनात गोंडी लिपीने आणि गोंडी भाषेने एक समृद्ध राजभाषा म्हणून सन्मान प्राप्त केला होता. मुन्शी मंगलसिंह मसराम यांनी १९१८ साली गोंडी मुळाक्षरे हस्तलिखिताच्या स्वरूपात लिहिली. पुढे त्यांच्या मुलानं, म्हणजे एडी भावसिंग मसराम यांनी, "गोंडी लिपी‘ या नावाने ते हस्तलिखित २ जुलै १९५१ रोजी प्रसिद्ध केले.

१ जून १९५७ रोजी ‘आदर्श आदिवासी गोंडी लिपी बोध’ हे पुस्तक देवनागरी लिपीत प्रकाशित झाले. विठ्ठलसिंग धुर्वे यांनीही "गोंडी लिपी सुबोध‘ नावाचे पुस्तक १९८९मध्ये प्रकाशित केले.

सीताराम मंडाले यांनी मुकुंद गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली २०११ साली गोंडी भाषेचा फॉंट तयार केला. "कोयाबोली‘ नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून गोंड समाजाला गोंडी लिपी पाहायला मिळाली. गोंडी भाषेचा फॉंट तयार झाल्याने गोंड समाजाच्या विद्यार्थ्यांना गोंडी भाषेतली पुस्तके मिळणे, परिणामी मातृभाषेत शिक्षण घेणे शक्‍य झाले. यापूर्वी गोंडी भाषा अस्तित्वात असूनदेखील ती मुद्रणात आली नव्हती. ती हस्तलिखित स्वरूपात असल्यामुळे या भाषेतल्या लिखाणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकत नव्हता. फॉंटमुळे हा अडथळा दूर झाला.

गोंडी भाषेतील काही अपरिचित शब्दसंपादन करा

अनेक अपरिचित, अर्थवाही व इतर भाषांमध्ये न आढळणारे शेकडो शब्द गोंडी भाषेत आहेत. उदा० अद (तो/ती), इद (हा/ही), एटी (बकरा), उंदी (एक), ओडी (टोपली), कयता (कडू), कर्सना (खेळणे), कस्कना (चावणे), किस (आग), केंजा (ऐका), ढ‌ुंगाल (उंच), नत्तुरी (लाल), नन (मी), नय (कुत्रा), नल्लानेट (सोमवार), नावा (माझा), नेटी (दिवस), नेंड (आज), पदोमान (जानेवारी), पन्ने (बेडूक), पाटा (गाणे), पुंगार (फूल), बोरोंदा (कमळ), भूम (पृथ्वी), मरका (आंबा), मावा (आमचा/आमचे), येर (पाणी), वतूर (पावसाळा), सटार (विळा), सियाना (देणे), हिनाल (पातळ/बारका),अल्ली(उंदीर),अळमी(म्हैस),मळा(झाड),आखींग(पाने),ईंगे(हो),अल्ले(नाही),जवळी(भात),साळी(भाकर),केंजा(ऐक)इत्यादी.

गोंडी भाषा, संस्कृती आणि साहित्य यांवर लिहिली गेलेली मराठी, हिंदी, गोंडी पुस्तके आणि त्यांचे (लेखक)संपादन करा

  • कंकाली (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली - जन्म २ फेब्रुवारी, १९४९; मृत्यू : ३० ऑक्टोबर २०१५)
  • कुवारा भिमाल पेन सार (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • कोया भीडिता गोंडी सगा बिडार (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंड वाणी का पूर्वोतिहास (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडवाना का सांस्कृतिक इतिहास (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोडवाना कोटदर्शन (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडवाना गढ़ दर्शन (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडी नृत्य का पूर्वोतिहास (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडी भाषा व्याकरण (डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडी भाषा शब्दकोष भाग १, २ (डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडी भाषा सीखिए (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडी लम्क पुन्दान (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • गोंडी लिपी सुबोध (विठ्ठलसिंग धुर्वे)
  • गोंडी संस्कृतीचे संदर्भ (व्यंकटेश आत्राम)
  • चांदागढ़ की महाकाली कली (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • जंगो दाई एवं ग्रामीण देवी देवताओं के भजन (हिंदी-गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • तीन्दाना मांदी (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • ते वारीना पाटांग (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • पारी कुपार लिंगो गोंडी पुनेम दर्शन (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)  :
  • बस्तर की दंतेवाडीन वेनदाई दंतेश्वरी (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • बृहद हिंदी गोंडी शब्दकोष (डॉ. मोतीरावण कंगाली)
  • मराठी गोंडी शब्दकोश
  • मुंडारा हीरोगंगा (गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • शम्भु उपासक महाराजा रावण के भजन (हिंदी-गोंडी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • सिन्धु घाटी का गोंडी में उद्वचन (हिंदी, डॉ. मोतीरावण कंगाली)
  • हाकारा (भुजंग मेश्राम)
  • हिंदी गोंडी शब्दकोश (डॉ. मोतीरावण कंगाली)



 कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यासमदत करा. 


आदिवासी

आदिवासी समाजाचा इतिहास

आदिवासी समाज हा अतिप्राचीन मुळ भारतीय समाज आहे. एकेकाळी भारतीय वनसंपत्तीचा मालक असणारा हा समाज इंग्रजांच्या आर्थिक शोषणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनत गेला. आदिवासी म्हणजे आदिकाळापासुन वास्तव्य असणारा समुह होय. आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनाचे इतर समाजाशी काही देणेघेणे नसते. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लोकांपेक्षा भिन्न असतात. जंगलात राहणारे काही आदिवासी तेथील उत्पादने शहरांत आणून विकतात. भारतीय राज्यघटनेत अशा आदिवासीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरी-व्यवसायात आणि निवडणुकांत उमेदवार म्हणून त्यांच्यासाठी खास जागा ठेवल्या आहेत.भारतात ९ ऑगस्ट हा दरवर्षी आदिवासी दिवस म्हणून साजरा होतो. आदिवासी लोक भारताखेरीज जगातील अन्य देशांतही आहेत. इ.स. १९६२ साली शिलॉंगमध्ये आदिवासी समितीच्या परिषदेने आदिवासीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे- "एका समान भाषेचा वापर करणाऱ्या, एकाच पूर्वजापासून उत्पत्ती सांगणाऱ्या, एका विशिष्ट भू-प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या तंत्रशास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेल्या, अक्षरओळख नसलेल्या व रक्तसंबंधावर आधारित, सामाजिक व राजकीय रीतिरिवाजांचे प्रामाणिक पालन करणाऱ्या एकजिनसी गटाला 'आदिवासी समाज' म्हणताता. [१]

  • कोरकू बोली : वर्णनात्मक आणि समाजभाषावैज्ञानिक अभ्यास, डॉ. काशीनाथ बऱ्हाटे, देवयानी प्रकाशन , मुंबई , २०१२

भारतातील आदिवासींच्या मुख्य जमातीसंपादन करा

आदिवासींच्या बोलीसंपादन करा

आदिवासींच्या भाषा सर्वेक्षणात भारतात आर्यपूर्व काळात अस्तित्वात बोलल्या जाणाऱ्या अनेक मूळ आणि प्राचीनतम बोलीभाषा आढळल्या. त्या बोलीभाषा म्हणजे ढोरी (टोकरे कोळी), कोरकू, कोलामी, खारिया, गोंडी, गोरमाटी, ठाकरी, वाघरी, वाघरामी, पारधी, देहवाली, दो, परधानी, पावरी, भिलोरी, भूमिज, माडिया, मुंडारी, संथाली, सावरा, हलबी,मावळी वगैरे. यांतील बहुतेकांना लिपी नाही, आदिवासी समूहांकडून त्या फक्त बोलल्या जातात. परंतु त्या बोलणाऱ्यांची संख्या थोडी आहे. काही आदिवासी भाषांना लिपी आहे. उदाहरणार्थ संथाली. गोंडी ही द्रविडी भाषा कुटुंबातील प्रमुख आणि समृद्ध बोलीभाषा आहे.

आदिवासी लोकगीतेसंपादन करा

आदिवासी समूहांची संस्कृती समृद्ध असून त्यांची वैशिष्ट्यपूर्ण गीते, नृत्यप्रकार हा त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

कातकरी गीत-

मुरमीचा गण जल्म झाला पातालात |
ते गण गेला कोणाच्या वंश्याला |
वंश्याला जर गेला नसता पूंजला मिलला असता |
पन आता कार न्हाई मिळत पूजाला ||
येथून गण झाला पुरा, म्हाईत असलं तर सांग रं सभेला || [२]

गोंड भजन-
अमर कंटक नाळ नर्बदाल वासी, केंज्या ग्यानी सारा जीवां पैदा किसी
आदिवासी भिल्ले कोयजाले, फाड ते होरके, बसे माझी ||
नर्मदाना येर उंजीकून अल्मस्त होरे बने मातुरे 
कुम्राल इंदोर नर्बदाल असकेवासी ||


महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशातील काही प्रसिद्ध लोकगीत आर्सो देखींने तिरसा भावे जमानो हीरो देखयो डूवे चस्मा काव्वी जाकिट पेहरो नेता देखयो वो मे ते फैशन करीने भंगोर्या मा में गोयु वो || आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो || २ || संजय किराड़े मारू नाम रे जुवानाय || टोपी पटेल मारू दोस्ती छे वो जुवानाय || २ || आर्सो देखींने तिरसा भावे जमानो हीरो देखयो डूवे चस्मा काव्वी जाकिट पेहरो नेता देखयो वो मे ते फैशन करीने भंगोर्या मा में गोयु वो || आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो || २ || गजरा ने मौसम गजरो वारु लागे वो || वो जुवानाय सम्बिवे ले वात मारी || कायदे आई लव यु वो जानू मारी कायदे आई लव यु वो जुवानाय मारी आर्सो देखींने तिरसा भावे जमानो हीरो देखयो डूवे चस्मा काव्वी जाकिट पेहरो नेता देखयो वो मे ते फैशन करीने भंगोर्या मा में गोयु वो || आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो || २ || काहनी काजे देखों ने काहनी काजे रोहने दोम || २ || 101 जुवानाय भंगोर्या मा आवी रोय टोपी पटेल नाव् मारो ओजर मारो गाव वो || २ || वो तुते उजर भंगोरिया मा आवेजी गन्ना ने रोस आप्नु पिसू वो || २ || आर्सो देखींने तिरसा भावे जमानो हीरो देखयो डूवे चस्मा काव्वी जाकिट पेहरो नेता देखयो वो मे ते फैशन करीने भंगोर्या मा में गोयु वो || आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो आख्खी जुवानाय मारे भिनी भावे वो || २ || भंगोरिया ने भीड़ मा एखेली एखेली मा फिरे जुवानाय || २ || पुर्या पारिने भुर्सू नि होय गालो पर गुलाल लागाड़ी देय पुर्या पारिने भुर्सू नि होय गालो पर गुलाल रोग्डी देय भंगोरिया ने भीड़ मा एखेली एखेली मा फिरे जुवानाय || २ || टोपी पटेल मारू दोस्ती छे आच्छी आच्छी लड़की पटावे || २ || भंगोरिया ने भीड़ मा एखेली एखेली मा फिरे जुवानाय || २ || भंगोरिया ने भीड़ मा एखेली एखेली मा फिरे जुवानाय || २ ||

आदिवासींमधील काही ऐतिहासिक व्यक्ती व सरसेनापती (छ. शिवाजी महाराजांच्या काळात)संपादन करा

• किल्लेदार खेमाजी रघतवान (किल्ले शिवनेरी)

•किल्लेदार बुधाजी भालचिम (चावंड )

आदिवासी, त्यांची संस्कृती, परंपरा आणि अडचणी यांवरील पुस्तकेसंपादन करा

  • अनुसूचित जाती-जमातीचे कल्याण व संरक्षण कायदे आणि त्यांची अंलबजावणी (न्या. डॉ. यशवंत चावरे)
  • आदिवासी (भाऊ मांडवकर)
  • आदिवासी अस्मितेचा शोध (माधव सरकुंडे)
  • आदिवासी आयकॉन्स : ३० आदिवासींच्या यशोगाथा (डॉ. तुकाराम बी. रोंगटे)
  • आदिवासी कथा आणि व्यथा (डॉ. धैर्यशील शिरोळे)
  • आदिवासी कोकणांच्या कथा (संपादक - विजया सोनार)
  • आदिवासींचे अनोखे विश्व (निरंजन घाटे)
  • आदिवासी पावरांच्या कथा (कहाण्या), प्रा. डी.जी. पाटील)
  • आदिवासी पावरांच्या देवकहाण्या (प्रा. डी.जी. पाटील)
  • आदिवासी बोलू लागला (माधव बंडू मोरे)
  • आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन साहित्यमीमांसा (डॉ. श्रीपाल सबनीस)
  • आदिवासी मूलत: हिंदूच (डॉ. प्रभाकर मांडे)
  • आदिवासी लोककथा (डाॅ. गोविंद गारे)
  • आदिवासी लोकनृत्य लय, ताल आणि सूर (डॉ. गोविंद गारे)
  • आदिवासी साहाय्यक प्रकल्प अधिकारी परीक्षा मार्गदर्शक (पाठ्यपुस्तक, प्रा. संगीता लाडे, प्रा. स्मिता जोशी)
  • आदिवासी साहित्य : नियतकालिकातील (डॉ. तुकाराम बी. रोंगटे)
  • आफ्रिकेतील आदिवासी पारंपरिक धर्म व संस्कृती (अच्युत पाठक)
  • आरसा : आदिवासी जीवन शैलीचा (डॉ. भास्कर गिरधारी)
  • एकलव्य आणि भिल्ल आदिवासी (प्रा. गौतम निकम)
  • कोकणांचे मौखिक वाङ्मय (कविता, संपादक : विजया सोनार)
  • कोंडी आदिवासींची आणि नक्षलवाद्यांची (हेमंत कर्णिक)
  • डोंगरकूस : आदिवासींच्या जीवनावरील कादंबरी (दि.वि. जोशी)
  • दलितांचे आणि आदिवासींचे समाजशास्त्र (प्रा. पी.के. कुलकर्णी
  • नक्षलवादी आणि आदिवासी (डाॅ. गोविंद गारे)
  • पारधी समाज बदल व समस्या (किशोर राऊत)
  • बिरसा मुंडा आणि मुंडा आदिवासी (प्रा. गौतम निकम)
  • महाराष्ट्रातील आदिवासी (डॉ. शौनक कुलकर्णी)
  • महाराष्ट्रातील आदिवासी जमाती (डाॅ. गोविंद गारे)
  • रानबखर : आदिवासींच्या जीवनसंघर्षाचे पदर (मिलिंद थत्ते)
  • शूर आदिवासी मुलांच्या गोष्टी (सुरेशचंद्र वारघडे)
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी : ठाकर (मोहन रणसिंग)
  • कोरकू बोली:वर्णनात्मक आणि समाजभाषावैज्ञानिक अभ्यास ( डॉ. काशीनाथ बऱ्हाटे )


चित्र:Baiga woman and child, India.jpg|बैगा महिला चित्र:एक आदिवासी घर.jpg|एक आदिवासी घर चित्र:Bullock Cart used by Korku tribal in Melghat, Maharashtra.jpg|मेळघाट येथील महाराष्ट्र) </gallery>

बाह्य दुवेसंपादन करा

  1. ^ नाडगोंडे, गुरुनाथ (१९८६). भारतीय आदिवासी. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन. pp. ३.
  2. ^ डॉ. बाबर सरोजिनी- एक होता राजा
शेवटचा बदल ३ दिवसां पूर्वी 2409:4042:791:B371:0:0:372:50AC कडून


गोंडी भाषा

गोंडी एक दक्षिण-मध्य द्रविड भाषा आहे. हि भाषा मुख्यतः मध्य प्रदेशगुजराततेलंगणामहाराष्ट्रछत्तीसगडआंध्र प्रदेश आणि जवळच्या शेजारच्या राज्यांमधील जवळपास दोन दशलक्ष गोंड लोक बोलतात.[१]  ही गोंड लोकांची भाषा असूनही गोंडांपैकी फक्त एक पंचमांश लोक ही भाषा बोलू शकतात, ज्यामुळे ते विलुप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोंडीमध्ये समृद्ध लोक साहित्य आहे, यातील उदाहरणे म्हणजे विवाह गाणे आणि नाटके.

वैशिष्ट्येसंपादन करा

गोंडीत दोन-लिंग प्रणाली आहेत. मुळतत्वे पुल्लिंगी अथवा अन्य लिंगी असतात. प्रोटो-द्रविड पासून गोंडी भाषेची मार्गच्युती "इनिशिअल व्हॉइस्ट सटॉप्स" (ग, ज, ड, द, ब) आणि "ऍस्पिरेटेड सटॉप्स" (घ, झ, ढ,ध, भ) ह्या आवाजांच्या वाढीने सुरु झाली. 

बोलीभाषा संपादन करा

गोंडीच्या बहुतेक बोलीभाषा अद्याप अपर्याप्तपणे नोंदवल्या गेल्या आणि वर्णित केल्या आहेत. डोरला, कोया, माडिया, मुरिया आणि राज गोंड या महत्त्वाच्या बोलीभाषा आहेत. काही मूलभूत ध्वन्यात्मक वैशिष्ट्ये दक्षिणेकडील बोलीभाषांना  उत्तरपश्चिमी बोलीभाषांपासून  विभक्त करतात. एक मूळ फरक प्रारंभिक "स" चा उपचार आहे, जो उत्तर व पश्चिम गोंडीमध्ये संरक्षित आहे, तर दक्षिणेत आणि पूर्वेत त्याचा "ह" झाला आहे; काही इतर बोलीभाषा मध्ये तो पूर्णपणे गमावला गेला आहे. इतर बोलीभाषांमध्ये प्रारंभिक "र" आणि "ल" चा फेरफार होतो आणि "ए " आणि "ओ" चा  "आ" होतो.

लेखन Harbara iteke sadayingसंपादन करा

गोंडी लेखन दोन प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते : तद्देशीय लिपी वापरुन अंगीकृत लिपी वापरुन.

पारंपारिकपणे, मोठ्या प्रमाणावर तद्देशीय लिपी उपस्थित नसल्यामुळे, गोंडी भाषेसाठी देवनागरी आणि तेलगू लिप्या अंगीकृत केल्या गेल्या आहे.

गोंडीसाठी मूळ लिपी तयार करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. सन १९२८ मध्ये, मुन्शी मंगल सिंग मसारम यांनी ब्रह्मी वर्णांवर आधारित आणि भारतीय वर्णमाले सारख्याच स्वरूपात गोंडी साठी एका तद्देशीय लिपीची रचना केली.[२]तथापि, ही लिपी व्यापकरित्या वापरली गेली नाही आणि बहुतेक गोंड अजूनही निरक्षर आहेत.

महाराष्ट्र ओरिएंटल मॅन्यूस्क्रिप्ट लायब्ररी ॲंड रिसर्च सेंटर ऑफ इंडियाच्या मते, या लिपीमध्ये एक दर्जन हस्तलिखित सापडले आहेत. गोंडी लोकांमध्ये या लिपीबद्दल च्या जागरुकते साठी आणि ह्या लिपीची वाढ करण्यासाठी कार्यक्रम विकासाच्या टप्प्यात आहेत.

Referencesसंपादन करा

  1. ^ Beine, David K. 1994. A Sociolinguistic Survey of the Gondi-speaking Communities of Central India. M.A. thesis. San Diego State University. chpt. 1
  2. ^ (PDF)http://std.dkuug.dk/JTC1/SC2/WG2/docs/n3841.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)हरवलेले किंवा मोकळे |title= (सहाय्य)

गोंडी लिपी

गोंडी ही द्राविडी भाषांच्या आदिवासी बोलींपैकी सर्वांत मोठी बोली आहे. ती मुख्यतः मध्य प्रदेशमहाराष्ट्रआंध्र प्रदेशओरिसाउत्तर प्रदेश या राज्यांत बोलली जाते. गोंडीची अनेक स्थानिक रूपे आहेत. गोंडीचा पाया द्राविडी आहे.

सन १९८१च्या जनगणनेनुसार आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, ओरिसा या राज्यांत मिळून गोंडी बोलणार्‍यांची संख्या २ कोटी ४५ लाख १९ हजार ४६९ एवढी आहे. एकट्या महाराष्ट्रात ती ३५ लाख १९ हजार ३३१ इतकी आहे.

अतिप्राचीन गोंडवनात गोंडी लिपीने आणि गोंडी भाषेने एक समृद्ध राजभाषा म्हणून सन्मान प्राप्त केला होता.

समाजाशी सुसंवाद साधणारी गोंडी भाषा तिचे अतिप्राचीनत्व सिद्ध करते. हे सिद्ध करण्यासाठी गोंड समाजातले साहित्यिक मुन्शी मंगलसिंह मसराम यांनी गोंडी मुळाक्षरे हस्तलिखिताच्या स्वरूपात लिहिली. हे काम त्यांनी सन १९१८मध्ये केले, ते त्यांच्या मुलाने, म्हणजे एडी भावसिंग मसराम यांनी ’गोंडी लिपी‘ या नावाने २ जुलै १९५१ रोजी प्रसिद्ध केले.

१ जून १९५७ रोजी ‘आदर्श आदिवासी गोंडी लिपी बोध’ हे पुस्तक देवनागरी लिपीत प्रकाशित झाले. विठ्ठलसिंग धुर्वे यांनीही "गोंडी लिपी सुबोध‘ नावाचे पुस्तक गोंडी वाचकांसमोर १९८९मध्ये आणले.


Comments

Popular posts from this blog

अग्निकुल सिद्धांत के अनुसार #चार #क्षत्रिय #राजपूत_कुलों

कर्नल जेम्स टोड द्वारा गुर्जर शिलालेखो का विवरण