चालुक्य (Chalukyas)


    • दक्षिण भारतात प्रतापी असलेल्या घराण्यांपैकी चालुक्य घराणे होते.
    • हे घराणे मूळचे वातापीचे त्यानंतर त्याचे रूपांतर (वातापी-बदामी) (आजचे विजापूर-कर्नाटक), बदामीच्या चालुक्यात झाले.
    • (७ व्या शतकातील पिष्टपूर राजधानी असलेले पूर्वेकडील चालुक्य, वेमुलवदाचे चालुक्य आणि कल्याणीचे चालुक्य अशा चालुक्य घराण्याच्या इतर शाखांही होत्या.)
    • (बदामीचे चालुक्य घराण्यातील पहिला राजा जयसिंह होय. याच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.
    • त्याच्यानंतर त्याचा पुत्र रणराग गादीवर आला. या दोघांनी विजापूर जिल्ह्यातील वातापी → बादावी→ बदामी या राजधानी असलेल्या राज्यांत इसवी सनाच्या ६ व्या शतकात राज्य केले. या घराण्यातील राजांनी विंध्य पर्वत, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचा काही भाग या प्रदेशांवर सुमारे दोनशे वर्षे सत्ता गाजविली.)

    पहिला पुलकेशी (इ.स. ५३५ ते ५६६) –

    • पहिला पुलकेशी (इ.स. ५३५ ते ५६६) हा चालुक्य घराण्यातील पराक्रमी आणि घराण्याचा वास्तव संस्थापक होय.
    • त्याने अनेक मोहिमा यशस्वी केल्या व अश्वमेध यज्ञही केला.
    • विजापूरनजीकच्या वातापी किल्ल्याची पायाभरणी यानेच केली.

    कीर्तिवर्मन (इ.स. ५६७ ते ५९७)

    • पहिला पुलकेशीचा वारस म्हणून कीर्तिवर्मन (इ.स. ५६७ ते ५९७) बदामीच्या सत्तेवर आला.
    • त्याने आपल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत मौर्य. कदंब आणि नळ राजांचा पराभव करून आपले राज्य खंबीर केले.
    • त्याचप्रमाणे वंग, अंग, मद्रक, पांड्य, चोल आणि इतर राजांना त्याने आपले मांडलिक बनवले. त्याने अनेक मंदिरे उभारली.

    मंगलेश (इ.स. ५९७ ते ६१६)

    • किर्तीवर्मनचा बंधू मंगलेश (इ.स. ५९७ ते ६१६) गादीवर आला.
    • त्याने कल्चुरी व रेवती राजांचा पराभव करून कल्चुरीच्या राजास कैद केले व रेवती राज्यावर इंद्रवर्मन याची राज्यपालपदी नियुक्ती केली.
    • त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस झालेल्या यादवी युद्धात त्याचा पुतण्या दुसरा पुलकेशी विजयी होऊन गादीवर आला.

    दुसरा पुलकेशी (६१६ ते ६४३) :

    • मंगलेशच्या अखेरच्या काळात झालेल्या यादवी युद्धामुळे चालुक्य साम्राज्यावर मोठेच संकट कोसळले. त्याचा फायदा घेऊन शत्रू वरचढ होण्याची पाळी आली. परंतु दुसऱ्या पुलकेशीने परिस्थिती मोठ्या हिमतीने सांभाळली आणि ज्या शेजारच्या राजांनी बंडखोरी केली होती, आक्रमण केले होते, त्या सर्वांना नमवून बदामीच्या चालुक्याच्या इतिहासातील शिखर प्राप्त केले.
    • त्याच्या पराक्रमाची व विजयाची स्तुतिस्तोत्रे कर्नाटकातील ऐहोळ येथील जैन मंदिराच्या भिंतीवर कोरली आहेत.
    • भारवी व कालिदास या विख्यात संस्कृत कवींच्या मालिकेत बसणारा दुसऱ्या पुलकेशीच्या दरबारातील राजकवी रविकीर्ती याने प्रशस्ती’ हे काव्यच पुलकेशीच्या पराक्रमावर लिहिले आहे.
    • पुलकेशीने आपल्या राज्याच्या मध्यभागीच असलेल्या सोलापूर भागातील बंडखोर आप्पयिका याचा काटा काढला आणि दुसरा बंडखोर गोविंदा यास शरण यावयास लावले.
    • त्याने कदंब राज्याची राजधानी वनवासी जिंकले आणि म्हैसूरमधील गंग, कानरातील अलूप यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले.
    • गंग राजा दुर्विनीत याने आपल्या एका कन्येचा विवाह पुलकेशीशी लावून दिला. याच कन्येच्या पोटी पुढील वारस पहिला विक्रमादित्य जन्मास आला.
    • त्यानंतर त्याने कोकणातील मौर्य, नळ, कलचुरी, राष्ट्रकूट, लाट, मालव व गुर्जर राजांना नमविले. यामळे तो महाराष्ट, कर्नाटक. विदर्भ अशा तीन राज्यांचा राजा झाला त्याचे साम्राज्य ओरिसातील मही नदीपर्यंत विस्तारले. गादीवर आल्यानंतर चार-पाच वर्षांतच त्याने असे महत्त्वपूर्ण विजय मिळविले.
    • पुलकेशीने आपला लहान बंधू विष्णुवर्धन याच्या हाती राजधानीचा कारभार सोपवून दक्षिणपूर्व भागाकडे वळला. तिकडे दक्षिण कोशल आणि कोशल येथील राजांनी शरणागती पत्करली,
    • गोदावरी जिल्ह्यातील पिष्टपूर राज्य नाममात्रच राहिले.
    • इ.स. ६२० च्या सुमारास त्याने आपल्या दुसऱ्या जंगी मोहिमेत, आंध्रच्या विष्णुकुंडीनचा पराभव केला. त्याचा आंध्र प्रदेशाचा सर्व कारभार त्याने आपला लहान एकनिष्ठ बंधू विष्णुवर्धन यांच्याकडे सोपविला, पिष्टपूर ही या राज्याची राजधानी केली.
    • विष्णुवर्धन आयुष्यभर पुलकेशीशी एकनिष्ठ राहिला, परंतु त्याचा पुत्र आणि पिष्टपुर वारस पहिला जयसिंह याने मात्र आपले स्वातंत्र्य जाहीर केले व चालुक्य घराण्याची दुसरी गादी स्थापन केली. जयसिंहाची ही सत्ता पूर्वेकडील वेंगीचे चालुक्य म्हणून पुढे चालू राहिली.
    • आंध्र प्रदेशावर कबजा आणि गंगवरील वर्चस्व यामुळे दुसऱ्या पुलकेशीस पल्लव राजाशी संघर्ष करावा लागला. या दोन्ही सत्तांमध्ये कर्नाटक व तमिळनाडूतील राज्ये यांच्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी जोरदार लढाया सुरू झाल्या. या लढायांत पुलकेशी वरचढ ठरला आणि पल्लवांचा बराचसा प्रदेश त्याने आपल्या अधिपत्याखाली आणला. त्या वेळी पल्लवांचा महेंद्रवर्मन राज्यावर होता, त्यास पुलकेशीने कांचीच्या उत्तरेस २४ कि.मी. पर्यंत मागे खेचले. अर्थात, आक्रमक पुलकेशीस पल्लवांनी तोडीस तोड उत्तर देऊन त्याचा हल्ला परतविला.
    • ज्या वेळी दक्षिणेत पुलकेशी वर्चस्व मिळविण्यात दंग होता, त्याच वेळी हर्षवर्धन उत्तरेत आपले साम्राज्य मजबूत करण्यात गुंतला होता. अशा परिस्थितीत दोन महत्त्वाकांक्षी सत्तांमध्ये संघर्ष होणे अटळ होते. तसा संघर्ष इ.स. ६३१ ते ६३४ या काळात घडूनही आला.
    • तत्कालीन चिनी प्रवासी हुएनत्सँग या भागात फिरतीवर असताना त्याने हा संघर्ष प्रत्यक्ष पाहिला होता. त्याच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत सतत विजयाची घोडदौड करीत असलेल्या हर्षवर्धनला पुलकेशीकडून सपाटून मार खावा लागला, त्यामुळे हर्षवर्धन दक्षिणेत येण्यापासून पुलकेशीकडून समर्थपणे रोखला गेला. दरम्यान पल्लवांकडून जोरदार प्रतिक्रिया झाल्यामुळे दुसरा पुलकेशी नाराज झाला होता. पल्लवांवर वर्चस्व मिळविण्यासाठी तो संधीची वाट पाहत होता. याच वेळी पल्लव राजा महेंद्रवर्मननंतर त्याचा वारस पहिला नरसिंहवर्मन गादीवर आला. हीच संधी साधून पुलकेशीने पल्लवांवर हल्ला केला आणि राजधानी कांचीच्या सीमेवर येऊन थडकला.
    • योगायोगाने नरसिंहवर्मनला सिलोनच्या मानवर्माची लष्करी मदत मिळाली आणि नरसिंहवर्मनने पुलकेशीच्या सैन्याशी झालेल्या तीनही लढायांत चालुक्यांचा पराभव केला.
    • चालुक्यांवर मिळालेल्या विजयाने उल्हसित होऊन, कांचीचे अस्तित्व दोन वेळा धोक्यात आणणाऱ्या दुसऱ्या पुलकेशीवर चाल केली व चालुक्य राजधानी बदामी कबजात आणली. पल्लवांचा हा तडाखा इतका जबरदस्त होता की त्यानंतर दुसऱ्या पुलकेशीचे नावसुद्धा ऐकू येईनासे झाले. कदाचित पल्लवांशी झालेल्या चकमकीत तो मारला गेला असावा. (इ. स. ६४३)
    • दुसरा पुलकेशी चालुक्य घराण्यातील सर्वांत पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने आपल्या कारकिर्दीत आपल्या राज्याच्या मर्यादा कमालीच्या विस्तारल्या होत्या. त्याची कीर्तीही दिगंत पसरली होती.
    • त्याने इ. स. ६२५-६२६ मध्ये पर्शियाचा राजा दुसरा खुस्रो याच्या दरबारात आपला राजदूतही पाठविला होता. चिनी प्रवासी हुएनत्सँग पुलकेशीच्या पराक्रमामुळे आणि कुशल प्रशासनामुळे अत्यंत प्रभावित झाला होता.

    पहिला विक्रमादित्य (इ. स. ६५४ ते ६८१) :

    • दुसऱ्या पुलकेशीच्या मृत्यूनंतर चालुक्य घराण्याच्या इतिहासासंबंधी विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही.
    • ६४३ ते ६५४ या काळात चालुक्य घराणे निर्णायकी झाले होते.
    • दुसऱ्या पुलकेशीच्या मुलामध्ये वारसा संघर्ष सुरू झाला होता. त्याचा फायदा घेऊन चालुक्य साम्राज्यातील मांडलिक सरंजामदारांनी उठाव केला आणि आपले स्वातंत्र्य घोषित केले.
    • परंतु दुसऱ्या पुलकेशीच्या विक्रमादित्य या पुत्राने आपला बंधु जयसिंहवर्मन आणि गंग घराण्यातील राजा दर्विनीत या आपल्या आजोबाच्या (आईचे वडील) मदतीने पल्लव राजा नरसिंहवर्मनच्या कबजातून राजधानी बदामी परत मिळविली. त्याचप्रमाणे त्याने आपल्या अन्य बंधूंना चालुक्य गादीचा हक्क सोडण्यास भाग पाडले.
    • इ. स. ६५४ मध्ये विक्रमादित्याने स्वतःला राजा म्हणून घोषित केले व आपला एकनिष्ठ बंधू जयसिंहवर्मन यास दक्षिण गुजरातमधील लाटचे राज्य निष्ठेचे पारितोषिक म्हणून देऊन टाकले.
    • पहिला विक्रमादित्य म्हणून गादीवर आल्यानंतर त्याने आपले राज्य प्रथम मजबूत केले आणि पल्लवांवर चढाई करण्यासाठी त्याने जोरदार तयारी सुरू केली.
    • इ.स. ६६८ मध्ये त्याने कांचीवर चाल केली व पल्लव राजा दुसरा महेंद्रवर्मन याचा पराभव करून त्यास म्हैसूर राज्यात परागंदा होणे भाग पाडले, तिकडेच त्याचा मृत्यू झाला. त्याने पल्लवांची कांची आपल्या कबजात ठेवली होती.
    • त्यानंतर त्याने चोल, पांड्य आणि केरळ राज्यांवर आक्रमक हल्ले केले आणि त्रिचनापल्ली जिल्ह्यापर्यंत मजल मारली. अर्थात, पहिल्या विक्रमादित्याने या प्रदेशांवर चालुक्य सत्ता सुस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचे दाखले इतिहासात मिळत नाहीत.
    • चालुक्याकडून पराभूत होऊन हताश न होता, आपल्या पल्लव राज्यातून हद्दपार झालेला पल्लव राजा परमेश्वरवर्मन (महेंद्रवर्मनच्या मृत्यूनंतर कांचीचा वारस) चालुक्याच्या कबजातून कांची मुक्त करण्याच्या तयारीस लागला होता. थोड्याच दिवसांत त्याने आपले सैन्य चालुक्य प्रदेशात घुसविले.
    • पल्लव सैन्याची इ. स. ६७४ मध्ये त्रिचनापल्ली जिल्ह्यातील पेरुवलनल्लूर येथे चालुक्य सेनेशी गाठ पडली. तुंबळ युद्ध झाले आणि पहिल्या विक्रमादित्यास पराभूत होऊन माघार घ्यावी लागली.
    • पल्लव सेना कूच करीत चालुक्य प्रदेशात धुमाकूळ घालीत असताना त्याची विक्रमादित्याचा पुत्र विनयादित्य व नातू विजयादित्य यांच्याशी जोरदार चकमकी झाल्या. पल्लव सेनेने या मोहिमेत कांचीत प्रचंड लूट आणली.

    अशा प्रकारे पहिल्या विक्रमादित्याच्या कारकिर्दीत चालुक्य-पल्लव संघर्षात बराच रक्तपात होऊनही कोणाची सरशी झाली हा प्रश्न अनिर्णितच राहिला.

    विनयादित्य (इ. स. ६८१ ते ६९६) :

    • इ. स. ६८१ मध्ये पित्याच्या मृत्यूनंतर चालुक्य गादीवर आलेल्या विनयादित्याचा काळ शांततेचा व भरभराटीचा होता, हे त्याने आपल्या शिलालेखात नोंदून ठेवले आहे.
    • त्याने पल्लव, चोल, पांड्य आणि केरळ या दक्षिणेतील आणि कल्चुरी व मालवे या उत्तर भागातील राज्यांवर विजय मिळविला होता.
    • हे विजय विनयादित्याने आपल्याच शिलालेखांमध्ये नोंदून ठेवले असल्याने, त्यांची सत्यता पारखूनच घ्यावी लागेल.

    विजयादित्य (इ. स. ६९६ ते ७३३) :

    • चालुक्य घराण्यातील विजयादित्य याची कारकीर्द सर्वांत दीर्घकाळ चालू राहिली. हा काळदेखील शांततेचा व भरभराटीचा होता.
    • आपला पुत्र दुसरा विक्रमादित्य याच्या सहकार्याने त्याने आपले राज्यप्रशासन उत्तमपणे चालविले होते.
    • लक्ष्मेश्वर येथील शिलालेखाच्या नोंदीनुसार त्याने पुत्र विक्रमादित्याकडे, राज्याचे स्थानिक प्रशासन, ग्राम व प्रशासन यांचे हक्क व कर्तव्ये यासंबंधीची पूर्ण जबाबदारी सोपविली होती.
    • कारकिर्दीच्या अखेरच्या काळात पुत्र विक्रमादित्याने पल्लव राजधानी कांची जिंकून घेतली व तेथील राजा दुसरा परमेश्वरन याच्यावर खंडणी लादली.
    • विजयादित्याने विजापूर जिल्ह्यातील पट्टदकल येथे भव्य संगमेश्वर (शिव) मंदिर बांधले.

    दुसरा विक्रमादित्य (इ. स. ७३३ ते ७४४) :

    • पित्याच्या मृत्यूनंतर गादीवर आलेल्या दुसऱ्या विक्रमादित्याची ११ वर्षांची कारकीर्द अनेक महत्त्वाच्या घटनांनी भरलेली आहे.
    • त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या काही वर्षांत अरबांच्या आक्रमणाचा मोठाच धोका उभा राहिला होता.
    • अरबांनी उत्तर गुजरातवर आक्रमण करून, उत्तरेतील चालुक्य राजधानी असलेल्या नवसारीपर्यंत ते येऊन पोहोचले होते. परंतु पहिल्या विक्रमादित्याचा बंधू जयसिंहवर्मन याचा पुत्र उत्तर गुजरातमध्ये चालुक्य राज्याची शाखा सांभाळणारा पुत्र पुलकेशीन याने अरबांशी समर्थपणे मुकाबला करून अरबांना पिटाळले होते.
    • दुसऱ्या विक्रमादित्याने पुलकेशीन याच्या या कर्तृत्वाबद्दल त्यास अनेक पदव्या देऊन गौरव केला.
    • यानंतर पल्लव राजा दुसरा नंदिवर्मन पल्लवमल्ल यांच्याशी आपल्या पूर्वजांच्या पराभवाचा सूड घेण्यासाठी दुसऱ्या विक्रमादित्याने युद्धास सुरुवात केली.
    • गंग राजा श्रीपुरुष या आपल्या मांडलिक राजाच्या मदतीने त्याने पल्लवांवर आक्रमण करून त्यांचा पराभव करून राजधानी कांची नगरात प्रवेश केला.
    • नगरात प्रवेश करून एखाद्या शत्रूचा नायनाट करण्याच्या इराद्याने लुटालूट न करता त्याने कांचीतील कैलासनाथ व अन्य मंदिरे येथील सोनेनाणे उदारपणे तेथील लोकांना बक्षीस देऊन कांची नगरवासीयांची मने जिंकली. या सर्व घटनांची नोंद कैलासनाथ मंदिरातील शिलालेखात करून ठेवली; आणि तो बदामीला परतला.
    • विक्रमादित्याने आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस, आपला पुत्र कीर्तिवर्मन यास पल्लव राजा नंदीवर्मनवर आक्रमण करण्यासाठी पाठविले. कीर्तिवर्मनने आपली पल्लवावरील मोहीम यशस्वी करून प्रचंड लुटीसह स्वगृही परतला.
    • दुसऱ्या विक्रमादित्याची कारकीर्दही अनेक नव्या मंदिराच्या उभारणीसाठी प्रसिद्ध झाली. कल्चुरी घराण्यातील त्याची महाराणी लोकमहादेवी हिने पट्टदकल येथे भव्य स्वरूपाचे लोकेश्वर मंदिर उभारले. सध्या ते विरुपाक्ष मंदिर या नावाने ओळखले जाते. या मंदिराचा आर्किटेक्ट अनिवारितचारी यास मंदिर उभारणीतील कौशल्याबद्दल विक्रमादित्याने त्यास गुणवत्ता पारितोषिके व मौल्यवान नजराणे देऊन गौरविले. विक्रमादित्याची दुसरी राणी आणि वारसपुत्र दुसरा कीर्तिवर्मन याची माता, त्रैलोक्य महादेवी हिनेही लोकेश्वर मंदिराच्या परिसरात भव्य त्रैलोक्येश्वर मंदिर उभारले.

    दुसरा कीर्तिवर्मन (इ. स. ७४४ ते ७५७) :

    • बदामीच्या चालुक्य घराण्यातील हा अखेरचा राजा होता. त्याच्या काळात राष्ट्रकूट घराण्याची सत्ता उदयाला आली होती. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याने मध्य प्रदेशातील बराचसा भाग आपल्या प्रभावाखाली आणला होता.
    • त्याने पल्लव राजा नंदीवर्मन पल्लव मल्ल याच्याशी मैत्री करार करून इ. स. ७५२ ते ७५३ मध्ये चालुक्य राजा कीर्तिवर्मनवर आक्रमण केले व स्वतःला दक्षिण देशाचा सम्राट म्हणून घोषित केले. तरीही दुसरा कीर्तिवर्मन कर्नाटकात काही काळ कसाबसा तग धरून होता.
    • शेवटी, राष्ट्रकूट घराण्यातील दंतिदुर्गाचा वारस राजा पहिला कृष्णा याने कीर्तिवर्मनाची कारकीर्द संपुष्टात आणली.
    • अशा प्रकारे सुमारे दोन शतके कांचीच्या पल्लव राजांशी संघर्ष करीत आलेली चालुक्य सत्ता इतिहासातून पुसली गेली.

    पूर्वेकडील चालुक्य –

    • ही चालुक्यांच्या घराण्याची दुसरी शाखा होती. या शाखेने १८ वर्षे राज्य केले.
    • दुसऱ्या पुलकेशीचा बंधू विष्णुवर्धन हा या शाखेचा पहिला राजा होता. तो त्या पूर्वी पिश्तपूर विभागाचा राज्यपाल होता. त्याने पिश्तपूर राजधानी करून चालुक्यांचे दुसरे राज्य जाहीर केले. त्याने आपली राजधानी वेंगी इथे आणली म्हणन या शाखेला वेंगीचे चालक्य असेही म्हटले जाते. मात्र त्याने राजधानी पुन्हा राजमहेंद्री येथे हलवली.
    • विष्णुवर्धननंतर विद्यादित्य व त्याच्यानंतर चौथा विष्णुवर्धन गादीवर आला. त्याचा राष्ट्रकूटांनी पराभव केला.
    • त्याच्यानंतर दुसरा विजयादित्य इ. स. ७९९ मध्ये गादीवर आला, परंतु त्यांचा बंधू भीम याने त्याच्या सत्तेस आव्हान उभे केले. कालांतराने याच भिमाने पहिला भीम म्हणून चालुक्य सत्ता संपादन केली. तो शूर होता, राष्ट्रकूटांशी त्याने अनेक वेळा लढाया केल्या. त्याला काही काळ विजयही मिळाला, परंतु सततच्या लढायांमुळे त्याची सामरिक शक्ती क्षीण झाली, तसेच घराण्यातील वारसायुद्धामुळे पहिल्या भिमाच्या मृत्यूनंतर राज्य सांभाळण्यास कोणी उरले नाही.
    • कल्याणीचे चालुक्य ही आणखी एक चालुक्य घराण्याची शाखा होती. राष्ट्रकूटांशी लढायांत कमजोर झालेली कल्याणीचे चालुक्य ही शाखा राष्ट्रकूटांची मांडलिक सत्ताच होती. राष्ट्रकूट राजा दुसरा कर्क याच्या काळात चालुक्य मांडलिक सरदार दुसरा तैल याने आपले स्वतंत्र राज्य जाहीर केले. तो पराक्रमी असल्याने त्याने चोल, चेदी, कुंतल, ओरिसा येथील राजांचा पराभव केला. पण त्याची सत्ता अल्पकाळच (इ. स. ९९३ ते ९३७) टिकली.
    • त्यानंतर कल्याणीच्या चालुक्यपदी इ. स. ९३७ मध्ये सत्याश्रय आला. त्याला परमार व कल्चुरी यांच्याशी लढा द्यावा लागला. परंतु उत्तर कोकण व गुजरात प्रदेशातील विजयांमुळे त्याची प्रतिष्ठा वाढली. त्याने चोल राजा राजराजा याचा पराभव केल्याने त्याची स्थिती मजबूत झाली.
    • इ. स. १००८ मध्ये पाचवा विक्रमादित्य सत्याश्रयाचा वारस म्हणून गादीवर आला. इ. स. १०१४ पर्यंत ६ वर्षे तो सत्तेवर होता.
    • त्याच्यानंतर दुसरा जयसिंह (इ. स. १०१५) राज्यावर आला. त्याची सत्ता नष्ट करण्यासाठी कल्चुरी, परमार व चोल यांनी संयुक्तपणे त्याच्यावर चाल केली, परंतु दुसऱ्या जयसिंहाने हा हल्ला परतवून लावला.
    • दुसऱ्या जयसिंहानंतर पहिला सोमेश्वर याने सत्ता सांभाळली. त्याला काही युद्धे करावी लागली, तरी तुलनात्मकदृष्ट्या त्याच्या काळात शांतताच होती.
    • त्याच्यानंतर सहावा विक्रमादित्य, तिसरा तैल व चौथा सोमेश्वर असे राजे क्रमाने कल्याणीच्या चालुक्यपदी आले.
    • अखेरचा चौथा सोमेश्वर याचा यादवांनी पराभव करून त्यास राज्य सोडून जाण्यास भाग पाडले.
    • इसवी सनाच्या १२ व्या शतकात कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता नामशेष झाली.

    चालुक्यांचे महत्त्व :

    • सुमारे दोनशे वर्षे चालुक्यांनी दक्षिण आणि पूर्व भारतावर अधिराज्य गाजवले. चालुक्य राजे शूर, पराक्रमी आणि कुशल प्रशासक होते.
    • त्यांना चोल, पल्लव, केरल, गंग आणि अन्य राजांशी सतत संघर्ष करावा लागला.
    • हर्षवर्धनाशीही लढा द्यावा लागला.
    • अनेक समस्यांना तोंड देत त्यांनी प्रजाहिताकडे पुरेसे लक्ष दिले.
    • कला वाङ्मय, वास्तुशिल्प इत्यादी क्षेत्रांतही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः मंदिर व मूर्ती यांच्या रचनेत त्यांनी वादातीत कार्य केले आहे.
    • त्यांच्या सहिष्णुतेच्या धोरणामुळे सर्व धर्मांचा प्रसार झाला. विशेषतः जैन धर्मास त्यांच्या काळात मानाचे स्थान मिळाले.
    • हिंदू धर्म, बौद्ध धर्म व जैन धर्म यांच्या अनुयायांत परस्पर सहिष्णुता असल्याने धार्मिक तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्यास चालुक्य सत्तेचा हातभार लागला.
    • चालुक्यांनी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत दक्षिण भारतात राष्ट्रीय एकतेला उत्तेजन दिले.

    If Any New Concept Found Updating This Chapter Again but so far everything is Perfect.


     

    There has been a critical error on this website.

    Learn more about troubleshooting WordPress.

    Comments

    Popular posts from this blog

    अग्निकुल सिद्धांत के अनुसार #चार #क्षत्रिय #राजपूत_कुलों

    कर्नल जेम्स टोड द्वारा गुर्जर शिलालेखो का विवरण