Posts

Showing posts from July, 2020

मंदोदरीच्या नैतिक विचारांची घुसमट

Image
मंदोदरीच्या नैतिक विचारांची घुसमट Maharashtra Times  |  Updated: 18 Feb 2020, 04:00:00 AM म टा... मंदोदरीच्या नैतिक विचारांची घुसमट म. टा. प्रतिनिधी, औैरंगाबाद स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या पती रावणाशी एकनिष्ठ राहू की अन्यायाला विरोध करून जाब विचारू या घुसमटीत अडकलेल्या मंदोदरीची मनोव्यथा 'अंतर्द्वंद्व' नाटकाने मांडली. मंदोदरी आणि शूर्पणखा यांच्या संवादातून उलगडणारे नाटक भवतालातील प्रश्नांवर भाष्य करून गेले. ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्यातील ललित रंगभूमीच्या 'अंतर्द्वंद्व' नाटकाचा प्रयोग रंगला. विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात सोमवारी (१७ फेब्रुवारी) सायंकाळी हा प्रयोग झाला. जगदीश पवार लिखित व प्रदीप गायकवाड-तन्मय जक्का दिग्दर्शित 'अंतर्द्वंद्व' नाटकाने रावणाची पत्नी मंदोदरीची व्यथा मांडली. काम आणि क्रोधात बुडालेल्या रावणाचा जाच अनेक स्त्रियांना सहन करावा लागला. पतीशी एकनिष्ठ असलेल्या मंदोदरीची यात सर्वाधिक कुचंबणा झाली. रावणाची बहिण शूर्पणखा आणि पत्नी मंदोदरी यांच्यातील संवादातून नाटक उलगडते. पतीव्रता म्हणून घुसमट सहन करा...

बलवान आणि बुद्धिमान शूर्पणखा

Image
बलवान आणि बुद्धिमान शूर्पणखा महाराष्ट्र टाइम्स  |  Updated: 26 Jul 2020, 05:23:00 AM शूर्पणखा राक्षसकुळाच्या नीतिप्रमाणचं वागली होती. एवढचं नव्हे, तर राक्षसांच्या क्रूर आणि हिंस्र मनोवृत्तीचा त्याग करून तिनं अत्यंत प्रेमानं आणि सभ्यपणे श्रीरामाकडे प्रेमाची याचना केली होती. मात्र... surpanakha मंजुश्री गोखले शूर्पणखा  राक्षसकुळाच्या नीतिप्रमाणचं वागली होती. एवढचं नव्हे, तर राक्षसांच्या क्रूर आणि हिंस्र मनोवृत्तीचा त्याग करून तिनं अत्यंत प्रेमानं आणि सभ्यपणे श्रीरामाकडे प्रेमाची याचना केली होती. मात्र... दंडकारण्याची स्वामिनी असलेली शूर्पणखा विश्रवाची मुलगी. अनौरस का होईना, नियोग पद्धतीने जन्म झालेली का होईना, पण ती विश्रवाची मुलगी होती. म्हणजेच ब्रह्मदेवाच्या नातवाची मुलगी. शुक्राचार्यांच्या इच्छेप्रमाणं का होईना पण विश्रवाचा अंश तिच्यात उतरलेलाच की! म्हणजे बुद्धिमत्तेचा थोडा फार अंश तिच्यात उतरलेला होताच. त्यातच ती राक्षसकुळातली. म्हणजे बुद्धिमत्तेसोबतच सामर्थ्य आणि मायावीपणाही तिच्यात आपसूकच उतरलेला. म्हणूनच ती मायावी राक्षशीण. आता आपण थोडा वेगळा विचार करू या. शूर्प...

दंडकारण्याची स्वामिनी!

Image
दंडकारण्याची स्वामिनी! महाराष्ट्र टाइम्स  |  Updated: 19 Jul 2020, 06:37:00 AM प्रेमाची अभिलाषा मनात बाळगून आलेल्या शूर्पणखेचे नाक-कान लक्ष्मणाने कापले, एवढंच आपल्याला तिच्याबद्दल ठाऊक असतं. पण शूपर्णखेचं अस्तित्व फक्त तेवढ्यापुरतंच सीमित होतं? नेमकी काय होती तिची कथा आणि व्यथा? ते वाचू या, आजपासून एकूण पाच भागांत... surpanakha मंजुश्री गोखले ... प्रेमाची अभिलाषा मनात बाळगून आलेल्या शूर्पणखेचे नाक-कान लक्ष्मणाने कापले, एवढंच आपल्याला तिच्याबद्दल ठाऊक असतं. पण शूपर्णखेचं अस्तित्व फक्त तेवढ्यापुरतंच सीमित होतं? नेमकी काय होती तिची कथा आणि व्यथा? ते वाचू या, आजपासून एकूण पाच भागांत... लेखाच्या शीर्षकावरून लक्षात आलंच असेल, की आजपासून रामायणातील आणखी एक स्त्री व्यक्तिरेखा ' शूर्पणखा ' हिच्याबद्दल ही लेखमाला असणार आहे. या जगात प्रत्येक गोष्टीसाठी एक मापदंड असतो, जसे की श्रीकृष्णाचे चातुर्य, श्रीरामचा आदर्श, राजहंसाचं चालणं, नवनीताची शुभ्रता, अमृताची गोडी... याच यादीत जसा लक्ष्मणासारखा बंधू हा मापदंड येतो, तसाच रावणासारखा बंधू हाही मापदंड येतो. आद्य खलपुरूष ही जरी रावणाची बिरूद...