वड्डर
विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वड्डर - लोकसंख्या (१९११) ३९०११९.
वड्डर - लोकसंख्या (१९११) ३९०११९.
👉सर्व हिंदुस्थानभर पसरलेली, तामिळ व तेलगु भाषा बोलणारी एक जात.
👉पोंटासाठीं बायकामुलांसह देशोदेशीं फिरणारे हे लोक विशेषत: मजुरी व मातीकाम करतात.
👉 यांची विशेष वस्ती मुंबई, वर्हाड, मध्यप्रांत, हैद्राबाद व म्हैसूर संस्थानें यांत आहे.
👉यांनां वड्ड, वोड्ड, बेलदार, आडू बेडगस, ओट्टोनाइकन व वडार, ओद्दन, ओड वगैरे दुसरीं नांवें आहेत.
👉आड (वड्ड) ह्या कानडी शब्दाचा अर्थ मिळणें व
👉बेल (फारशी शब्द) चा अर्थ कुदळीपावडें आहे.
👉यांच्या आचारविचार व भाषेवरून हे मूळचे द्रविड वंशीयांपासून झालेले असावेत असें म्हणतात.
👉परंतु ते आपल्यास क्षत्रिय म्हणवितात.
👉कानडा जिल्ह्यांतील वड्ड आपल्या जातींत लिंगायत कुरूब यांनां घेतात.
👉अनिश्चित राहाणीमुळें व दारूबाजपणामुळें त्यांची स्थिति दरिद्री व हीन झाली आहे.
👉तरी पण हे मेहनती आहेत.
👉हे सर्व हिंदु देवांनां पूज्य मानतात.
👉कुलदेव- व्यंकटरामण्णा, नरसोबा, मारूती, मुर्गव्वा येलम्मा इ. यांचे उपाध्याय ब्राह्मण आहेत.
👉शिक्षणाचा अत्यंत अभाव आहे.
👉दोन सख्या बहिणींशीं लग्न लावतां येतें.
👉 नवरीला ५ ते ३५ रू. पर्यंत हुंडा देतात.
👉हे गोमांसखेरीज सर्व प्रकारचें (उंदीर, डुक्कर वगैरेंचें) मांस खातात.
👉श्राद्धें मृताच्या तिथीस न करतां अक्षयतृतीया, नवरात्र किंवा गुडीपाडव्यास करतात.
👉प्रौढविवाह व दिराशीं पुनर्विवाह रूढ आहे.
👉सिंधमध्यें दिराखेरीज इतराशीं गांधर्व विवाह केल्यास दोघांनां जातीबाहेर टाकतात.
👉यांच्या तीन पोटजाती आहेत.
👉एक मातीवडर,
👉दुसरी गाडीवडर व
👉तिसरी जाटवडर.
👉हे लोक वैदू लोकांप्रमाणेंच लहानसें पाल देऊन वस्ती करतात.
👉मातीवडर बहुतेक रस्ते, विहिरी वगैरेसंबंधीं खोदकाम करतात.
👉गाडांवडर इमारतीकरितां दगड फोडण्याचें व पुरविण्याचें काम करतात.
👉जाटवडर दगडी जातीं वगैरे विकून उपजीविका करतात. 👉जातींतील तंटेबखेडे, पंचायतीमार्फत व वृद्ध माणसांच्या संमतीनें तोडण्यांत येतात.
👉कमीत कमी ३ जणांची पंचायत असते.
👉दंडाच्या रकमेचा मद्यपानाकडे विनियोग होतो.
👉खानदेशांत भोजा, भेंडी, मनु व कल्लु अशा जाती आहेत. 👉भोजांनांच ऊरू म्हणतात.
👉ते कोळसा व सिमेट तयार करतात व कल्लु दगडकटाई करतात.
👉 भोज हे आपल्याला सर्वांत श्रेष्ठ समजतात.
👉गुजराथेंत नवभाई वड्डर आहेत, ते आपल्यांत कोळी वगैरेंना घेतात.
👉रजपुतांशीं यांची सोयरीक होते (मुं. ग्या. भा. ७. २९४).
👉रसेल व हिरालाल यांच्या मतें वड्डर हे मूळचे अनार्य होत. 👉मध्यप्रांतांत ह्मांच्या ओडिया, लार्हिया, कुचबंधिया, मटकुडा, मुनुखार, वाडेवार (यांनां फार हलके समजतात). वगैरे उपजाती आहेत.
👉 सात नवरे असलेली बायको मध्यप्रांतांतील वड्डरांत फार सन्मान पावते.
👉तिचा आशीर्वाद वधुवर लग्नसमयीं घेतात.
👉व्यभिचारिणी स्त्रीस घरोघरी मातीनें भरलेली टोपली नेली म्हणजे शुद्ध करतात.
👉हे लोक चोर्याहि करतात.
👉पाथरवट किंवा पाथरोट, हे वर्हाडांत दगडाचें काम करतात.
👉यांची मुख्य देवता तुळजापूरची देवी.
👉हे व्यभिचार करणार्या स्त्रीपुरूषांस ४I५ रूपये दंड करतात.
👉टाकारी हे लोक जात्यांनां टाकी लावतात आणि संधि पाहून चोर्या करतात.
👉आसामात चहाच्या मळ्यांत हे लोक मजुरी करतात.
👉पंजाब व काश्मीरमध्यें कांही लोक मुसुलमान झाले आहेत. 👉वड्डरांचा सर्वसाधारण पोषाख म्हणजे मांडचोळणा, जाकीट व पागोटें, बायकांचा पोषाख फक्त लुगडें. [बॉम्बे गॅझे. भा. १२, १३, १६; रोझ-ग्लॉसरी; क्रूक-ट्राईब्ज; सेन्सस रि. १८९१, १९११, मुंबई, आसाम, वगैरे प्रांतांचे.]
Comments
Post a Comment