शिवाजी महाराजांनी यशवंतराव मोरेंना दंडीत का केले?
जावळी …पूर्ण हिंदवी स्वराज्य हे केंद्र असलेले हा भाग आता अर्ध्या हुन अधिक कोयने धरणाच्या पत्रात बुडालेला आहे.जेव्हा प्रचंड दुष्काळ पडतो तेंव्हा तिथले बुडालेले मंदीर आणि काही अवशेष तोंड बाहेर काढतात पण त्याकडे पाहण्याची कोणाला सोया नसते.आज पण इथे भुयारे , छुपे मार्ग असतील जे आता इतिहासाच्या पडद्या मागे गेले आहे.सातारा जिल्ह्यात प्रतापगड सोडल्यावर महाबळेश्वरकडे जाताना साधारण ३-४ किमी डावीकडेजावळीच्या मोरे घराण्याचे कुळ आहे. हे जावळीचं बेलागखोरं इतकं अवघड आणि अभेद्य की, १४व्या शतकात ५०००यवनी फौजा जावळीत गेल्या , त्या परतल्याच नाहीत आणि त्याचं काय झालं याचा ठाव ठिकाणदेखील लागला नाही.एकबाजूला घनदाट झाडी, महाबळेश्वर , भोरप्या(आता प्रतापगड) रायगड सारखे अभेद्य जंगलआणि किल्ले कपारी आणि तिथूनच कोकणात उतरला तर थेट अरबी समुद्र अशी ही जावळी खोऱ्याची रचना आहे.
अशी हि जावळी प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी अशी कोणाची हिम्मत नव्हती.चंद्रराव हे विजापुरकरांचे (आदिलशहा)पिढीजात जहागीरदार होत.जावळीच्या संस्थानची स्थापना करण्याऱ्या मूळ व्यक्तीचे नाव 'चंद्रराव' असे होते. या चंद्ररावला ६ मुलेहोती. त्यापैकी थोरल्या मुलाला त्याने स्वत:जवळ ठेवलेआणि इतरांना जावळीतील निरनिराळ्या जागा नेमूनदिल्या. थोरल्या शाखेत चंद्रारावापासून पुढील ८पिढ्या झाल्या. चंद्रराव - चयाजी - भिकाजी -शोदाजी - येसाजी - गोंदाजी - बाळाजी - दौलतराव.जावळीचा हा प्रत्येक शाखापुरुष किताब म्हणून चंद्रराव हे नाव धारण करू लागला.या शाखेतला आठवा पुरुष दौलतराव निपुत्रिक होता,. तर या दौलतराव ला येशवंतराव ला दत्तक आणि पुढे ह्याला "चंद्रराव" होन्यासाठी शिवाजी महाराजांनी मदत केली.. या दत्तक प्रकरण दरम्यान काही कारणास्तव आदिलशाहीकडून मदत ना घेता माणकाईने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले.
या चंद्ररावाला जे भाऊबंद होते त्यापैकी प्रतापराव,यशवंतराव (कसबे शिवथर), हणमंतराव (जोर),दौलतराव (महिपतगड), गोविंदराव (जांभळी), कोंढवी परगण्यातील केवनाळे व वाकण येथील बागराव ऊर्फभिकाजीराव, आटेगाव तरफेतील देवळी येथील सूर्यराव .वाई परगण्यातील बावधन या गावच्या गोमाजी नरसिंहव रामजी कृष्ण या दोन अधिकाऱ्यांनी चंद्ररावालापाठविलेले पत्र उपलब्ध आहे चंद्ररावाला गादीवर बसवण्यात शीवाजीमहाराजांची मदत झाली.पुढे इ. स . १६४८ मध्य स्वराज्यावर चालून आलेल्या फतहखानच्या स्वारीपूर्वी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सांगितले की चंद्रराव ला गादी वर बसवले. हा चंद्रराव आता स्वराज्य च्या प्रकरण मध्ये ढवळाढवळ करु लागला.
(वासोटा किल्ला आज सुद्धा जाण्यासाठी अतिशय अवघड आहे.सातारा हुन कास पठार तिथून बामणी तिथून शिवसागर तल्याम्सधून बोटीनेनप्रवास आणि तिथून कैक किलोमीटर चालत….)
स्वराज्यातील बंडखोर , पुंड,गुन्हेगार याना चंद्रराव सरळ सरळ अभय देऊन रक्षण करू लागलं.हा येशवंतराव आपल्या कह्यात राहील हा राज्यांचा अंदाज साफ साफ चुकला म्हणून त्यांनी रघुनाथ बल्लाळ अत्रे आणि संभाजी कावजी याना जावळी वर पाठवले.ते पाहून चंद्रराव रायरी (रायगड) वर सटकला. चंद्ररावाला महाराजांचं श्रेष्ठत्व मान्य होणारं नव्हतं. मोरेंनी महाराजांना लिहिलं, ‘‘..तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले? आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर! त्याच्या आणि (विजापूरच्या) बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. जावळीत येणारच तर यावे. दारूगोळा मौजूद आहे. जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही. येता जावळी, जाता गोवळी!’’ अखेरीस इ. स. १६५६ ला महाराज स्वत जातीने जावळीवर चालून आले. महाबळेश्वरवरून जावळीत उतरण्यासाठी मोठी तुकडी दक्षिणेच्या ‘रडतोंडी घाटा’ने उतरली आणि तिथे मोऱ्यांच्या सन्याने प्रतिकार केला. त्याच वेळी खुद्द राजे छोटी तुकडी घेऊन उत्तरेच्या ‘निसणीच्या घाटा’ने महाबळेश्वरवरून जावळीत उतरले आणि जावळी जिंकून घेतली. जावळी स्वराज्यामध्ये आली, म्हणजे – अत्यंत मोलाचे दुर्ग (रायरी, चंद्रगड, मकरंदगड, मंगळगड, सोनगड, चांभारगड), दुर्गम घाटवाटा (वरंध, ढवळेघाट, पारघाट), डोंगरी देवस्थानं (महाबळेश्वर, चकदेव, पर्वत), ताकदीचे डोंगर (भोरप्या. ज्यावर प्रतापगड बांधला), थेट सिंधुसागरापर्यंत झेप घेता येणं अन् मुख्य म्हणजे जावळीतले तालेवार हिरे (मुरारबाजी देशपांडे) गवसणं अशा खूप गोष्टी साधल्या होत्या. शिवरायांनी जावळी ताब्यात घेतल्यानंतर आसमंतात घोडय़ांच्या टापा, नगारे, तुताऱ्या आणि तोफांचा आवाज निनादत राहिला.चंद्रराव आणि त्याच्या मुलं ठार केले आणि स्वराज्याचा सर्वात भक्कम प्रदेश मिळाला.1648 ते 1655 पर्यंत राजे शांत होते कारण गनिमी कावा साठी उपयुक्त प्रदेश तो पर्यंत स्वराज्यात नव्हता.या प्रदेशाचे महत्व एवढे होते की आदिलशाही सुद्धा अंकित असलेल्या चंद्रराव च्या वाकड्या मध्ये गेली नाही.काही वर्षे महाराजांनी शुद्ध नमते घेतले.मात्र हा प्रदेश गेल्यावर मात्र आदिलशाहीच्या बेगम ने अफझल खान ला महाराजांवर आक्रमण करायला पाठवले.गनिमी काव्यासाठी उप्युक्त असलेला हा प्रदेश राजानी सोडला नाही.,अफझल खान सुद्धा इकडेच बोलावून संपवले.त्या नंतर प्रतापराव मोरे नि उरल्या सुरल् आदिलशाह सैन्याला विजापूर पर्यंत मार्ग दाखवला.
महाबळेश्वर जवळ बांधला…प्रतापगड (जावळीचा भोरप्या डोंगराचा राजानी स्वतः किल्ला बांधला आन नाव ठेवले प्रतापगड)
केवळ उद्यम पणे वेगळ्या ममूळे आणि दांडी बंडखोर स्वराजच्याला बेईमान लोकांना आश्रय दिला आणि यशवंतराव ने ही जावळी गमावली.
या जावळीतून स्वराज्याला खूप गोष्टी मिळाल्या1)बंदलचे
संदर्भ: शकाकर्तेबशिवराय by विजय देशमुख
जावळीचे राजधानी रायरी उर्फ रायगड
Comments
Post a Comment